Wednesday, September 18, 2019

Why Electric Vehicles can increase pollution in India?



As I see more and more Indian people talking about the need of electric vehicles for reducing pollution, I have to write this up.
Data shows that 72% of India's electricity comes from coal (Economic Times, May 12, 2019, written by G Seetharaman). Now first you want to burn the coal, generate electricity from it and then use it to charge the car batteries. But first have a look at the facts below:
● There is always some loss in energy conversion. So you'll be wasting let's say 20-30%(at least) of the total energy in the process of making electricity. Basic highschool science.
● Burning oil is more efficient than burning coal. Oil is cleaner than coal (but you know that already, don't you?)
You want electric vehicles? Ask for cleaner energy sources first. Start talking about alternative energy, from nuclear to wind, solar and hydro. Push Indian policymakers to adopt renewable and other cleaner energy sources. The day coal's contribution drops below 30%, I will start supporting the introduction of electric vehicles in India.
Peace.✌️
#energy #india #pollution #electricvehicles #tesla #cars
Edit: a friend of mine just told me about the recent developments in Indian start-ups working on solar-powered cars. Hope to see them running on the streets soon.
Also, I want you all to share this because people need to understand that not everything is as simple as it seems. We have to weigh-in all the factors before deciding what is the right thing to do.

Thursday, September 13, 2018

*सावधान! आपण स्टॅम्प वेंडर ला जास्त पैसे देत आहात का??*

*सावधान! आपण स्टॅम्प वेंडर ला जास्त पैसे देत आहात का??*

आज दिनांक 1 सप्टेंबर 2018 ला माझ्यासोबत झालेला किस्सा सांगतो. माझ्या आईने मला 11 स्टॅम्प पेपर आणायला सांगितल. भंडारा तहसील ऑफिस कडे स्टॅम्प वेंडर बसलेले असतात, त्यांना मी स्टॅम्प्स मागितले. स्टॅम्पसची किंमत *₹3500* होती, आणि त्यांनी मला *₹3610* मागितले. मी विचारलं हे *₹110* रुपये कशाचे? तर उत्तर मिळालं: _"प्रत्येक स्टँप चे *10₹* 'असेच' लागतात."_ मी बघितलं, आजूबाजूला सगळे लोक प्रति स्टॅम्प *10₹* जास्त देत आहेत...मला प्रश्न पडला, मी सरळ आईला फोन केला, बाबांना पण केला की हे असं असतं का....बाबा म्हणाले हे असं ओव्हरचार्ज लागत नाही...
मग मी बाकी वेंडर्स कडे पण गेलो, तिथेही असाच प्रकार सुरू होता.

मग मी सरळ तहसील ऑफिस मध्ये शिरलो, आणि तिथे विचारलं हे असं होत असल्याची माहिती कुणास द्यावी, तर उत्तर मिळालं तहसीलदारांना सांगा.
तहसीलदारांच्या कानावर ही घटना टाकल्यावर त्यांनी मला म्हटलं जे काही चार्ज ते घेत आहेत त्यांची पावती मागा आणि पावती देत नसल्यास माझ्याकडे या.
मी पुन्हा वेंडर कडे गेलो, त्यांनी पावती देण्यास नकार दिला. एका वेंडर ने तर अस म्हटलं, _"जे *₹3500* चे स्टॅम्प्स आहेत, त्यांचीच पावती मिळेल, बाकीचे *₹110* ची नाही..."_
मला सगळा प्रकार कळला. तहसीलदारांना हे कळवलं, त्यांनी आपल्या चपराश्याला माझ्यासोबत पाठवलं. चपराश्याने वेंडर ला मी तहसीलदारांकडे तक्रार केल्याचं सांगताच त्यांनी मला बसवून स्टॅम्प रेडी करून दिले आणि तितकेच पैसे घेतले जितकी स्टँप्सची किंमत होती.

हे झाल्यावर मी तहसीलदारांना धन्यवाद म्हटलं आणि थोडं या प्रकाराकडे लक्ष देण्याची विनंती तर केली, पण हा प्रकार बंद होईल असं मला तरी वाटत नाही.

तुमच्यासोबत असा प्रकार झाल्यास आधी जितके पैसे मागितले तितक्या सगळ्या पैशांची पावती मागा, पावती देण्यास नकार दिल्यास आपल्या तहसीलदारांना भेटा, लेखी तक्रार करा. तक्रारीत स्टॅम्प वेंडरचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर इत्यादी माहिती नमूद करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा - माझा ई-मेल : rbwasnik99@gmail.com